ईशान किशनचं दमदार कमबॅक

By Rohit Bibhishan Jetnavare
Aug 17, 2024

Hindustan Times
Marathi

टीम इंडियातून बाहेर असलेल्या इशान किशनने शुक्रवारी (१६ ऑगस्ट) बुची बाबू स्पर्धेत झारखंडकडून खेळताना झंझावाती शतक झळकावले. 

२६ वर्षीय किशनने मध्य प्रदेशविरुद्धच्या आपल्या खेळीत १० षटकार आणि ५ चौकार ठोकले. तो झारखंड संघाचा कर्णधार आहे.

तो १०७ चेंडूत ११४ धावा करून बाद झाला. या बळावर झारखंडने आपल्या पहिल्या डावात २७७ धावा केल्या.

तत्पूर्वी, दुसऱ्या दिवशी मध्य प्रदेशचा पहिला डाव २२९ धावांत आटोपला. यानंतर झारखंडची सुरुवातही चांगली झाली नाही.

अशा आव्हानात्मक परिस्थितीत किशन सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. त्याने ६१ चेंडूत अर्धशतक झळकावले. 

यानंतर त्याने आक्रमक पवित्रा घेत ८६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या शतकाच्या जोरावर झारखंड पहिल्या डावात आघाडी घेण्यात यशस्वी झाला. 

ईशान किशन नोव्हेंबर २०२३ पासून टीम इंडियातून बाहेर आहे. देशांतर्गत क्रिकेट न खेळल्याने त्याचा केंद्रिय करारही रद्द करण्यात आला होता.

यानंतर त्याने आयपीएल २०२४ मध्ये पुनरागमन केले आणि १४ सामन्यात ३२० धावा केल्या. यात एका अर्धशतकाचा समावेश होता.

Ishan KISHAN Instgram

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!