काय म्हणता! जुई गडकरीचं लग्न झालंय?
By
Harshada Bhirvandekar
Apr 15, 2024
Hindustan Times
Marathi
मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी. ‘ठरलं तर मग’ या मालिकेतून जुई घराघरांत पोहोचली.
या मालिकेत जुई ‘सायली’ ही भूमिका साकारत आहे. आपल्या अभिनयाच्या जोरावर जुईने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
अभिनयाबरोबरच जुई तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असते.
अनेकदा तिच्या लग्नाची चर्चाही रंगताना दिसते; एवढंच नाही तर तिचा घटस्फोटही झाला आहे असे अनेकांना वाटते.
नुकत्याच एका मुलाखतीत जुईने तिचे लग्न व घटस्फोटाच्या अफवांवर भाष्य केले आहे.
या मुलाखतीत तिने तिच्या वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले आहेत.
जुई गडकरी म्हणाली की, ‘अनेक फोटोंमध्ये मी मंगळसूत्र घातलेली दिसून येते. काही लोकांना लक्षात येत नाही की, मी तो फोटो मी ऑनसेट काढला आहे.’
जुई प्रमोशनला गेली तरी, ते मंगळसूत्र गळ्यातच असतं. त्यामुळे लोकांना वाटतं की, जुईचं लग्न झालं आहे.
इतकंच नाही तर, जुई गडकरीला दोन मुलं आहेत असेही अनेकांना वाटतं. मात्र, ही गोष्ट अजिबात खरी नाही.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा