दिवसा झोपणे चांगले आहे की वाईट याबाबत अनेक जण कंफ्यूज असतात.
pixabay
दिवसभरात जेवल्यानंतर डुलकी किंवा नॅप घेण्याचे फायदे पाहूया.
pixabay
बहुतेक लोकांना असे वाटते की दिवसा झोपणे शरीरासाठी चांगले नाही. संशोधननुसार दुपारी ३० मिनिटांची डुलकी मेंदूच्या कार्यांसाठी आणि मेंदूच्या पेशींसाठी चांगली असते.
pixabay
दिवसभरात ठराविक वेळीच झोपा. सर्व काही विसरून अर्धा तास डुलकी घेतली तर शरीर आणि मेंदू पुन्हा सक्रिय होतात. अभ्यासात असे दिसून आले आहे की झोपेमुळे मेंदूची क्रिया वाढते.
pixabay
जे लोक दिवसा थोडा वेळ झोपतात त्यांच्या मेंदूची क्रिया फक्त रात्री झोपणाऱ्या लोकांच्या तुलनेत वाढलेली असते.
pixabay
दिवसा झोपल्याने उच्च रक्तदाब कमी होतो. त्यामुळे हृदयविकारांपासून आपले संरक्षण होते.
pixabay
अभ्यासानुसार दिवसा डुलकी घेणे फायदेशीर असले तरी दिवसा जास्त डुलकी घेणे शरीरासाठी चांगले नाही. जर दिवसा जास्त झोपले तर मधुमेह होण्याची शक्यता असते.
pixabay
रात्री ६ ते ८ तास झोपा. मेंदू सकाळपासून दुपारपर्यंत कठोर परिश्रम करत असताना एक छोटी नॅप फ्रेशनेस आणि उर्जा देते.
pixabay
त्यामुळे दिवसभरात पुरेशी झोप घेतली तर चांगले जगता येते!