आयपीएल बक्षिस रक्कम किती?  

iplt20.com

By Rohit Bibhishan Jetnavare
May 24, 2023

Hindustan Times
Marathi

आयपीएलचा १६वा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

iplt20.com

ipl 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नईने गुजरातचा पराभव करत फायनल गाठली आहे.

iplt20.com

आता या मोसमातील एलिमिनेटर सामन्यात आज लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना होणार आहे. 

iplt20.com

हा सामना जिंकणाऱ्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरातचा सामना करावा लागेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचा प्रवास येथेच संपेल.

iplt20.com

एलिमिनेटर सामन्यात पराभूत होणार्‍या संघाला बक्षीस म्हणून ६ कोटी ५० लाख रुपये मिळतील. 

iplt20.com

दुसरीकडे, क्वालिफायर 2 मधून बाहेर पडलेल्या संघाला बक्षीस म्हणून ७ कोटी रुपये दिले जातील.

आयपीएल 2023 मधील चॅम्पियन संघाला २० कोटी रुपये बक्षीस म्हणून दिले जातील. 

iplt20.com

तर आयपीएल 2023 मधील उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये मिळणार आहेत.

iplt20.com

आयपीएलच्या या सीझनमध्ये ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप विजेत्यांना १५-१५ लाख रुपये मिळतील. 

iplt20.com

याशिवाय सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूला १२ लाख रुपयेही देण्यात येणार आहेत.

iplt20.com

टीआरपीमध्ये कोणत्या मालिका ठरल्या ‘टॉप १०’?