IPL 2024 चा सर्वात स्वस्त आणि महागडा कॅप्टन कोण?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Mar 25, 2024
Hindustan Times
Marathi
IPL २०२४ मध्ये कोणता कर्णधार सर्वाधिक मानधन घेतो, तसेच कोणत्या संघाच्या कर्णधाराला सर्वात कमी पगार मिळतो ते जाणून घेऊया.
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सला या मोसमात सर्वाधिक मानधन मिळणार आहे. SRH या हंगामात कमिन्सला २० कोटी ५० लाख रुपये देणार आहे
ANI
या यादीत लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या स्थानावर (१७ कोटी) आहे.
IPL
यानंतर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत तिसऱ्या स्थानावर (१६ कोटी) आहे.
तर मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याला (१५ कोटी) IPL २०२४ साठी मिळणार आहेत.
पाचव्या क्रमांकावर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार आहे. संजू सॅमसन (१४ कोटी) IPL २०२४ साठी घेणार आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर सहाव्या (१२.२५ कोटी) स्थानावर आहे.
पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवन सातव्या (८.२५ कोटी) स्थानावर आहे.
गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिल यंदाच्या मोसमासाठी (८ कोटी) घेईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार फाफ डु प्लेसिस यंदा ७ कोटी रुपये मानधन घेणार आहे.
तर ऋतुराज गायकवाड हा IPL २०२४ मध्ये सर्वात कमी मानधन (६ कोटी) घेणारा कर्णधार आहे.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा