क्लासेनने कोहलीकडून ऑरेंज कॅप हिसकावली

Enter text Here

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

SRH च्या हेन्रीक क्लासेनने मुंबई इंडियन्सविरुद्ध तुफानी खेळी खेळली. क्लासेनने ७ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने ३४ चेंडूत ८० धावा केल्या. 

यानंतर आता क्लासेन ipl 2024 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. 

म्हणजेच ऑरेंज कॅप आता क्लासेनच्या डोक्यावर आहे. याआधी ऑरेंज कॅप RCB चा फलंदाज विराट कोहलीकडे होती.

क्लासेनने २ सामन्यात १४३ धावा केल्या आहेत. तर कोहलीच्या २ सामन्यात ९८ धावा आहेत.

सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा ९५ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर मुंबईचा तिलक वर्मा ८९ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत चौथ्या स्थानावर आहे. 

यानंतर पंजाब किंग्जचा सॅम करन ८६ धावांसह पाचव्या स्थानावर आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत टॉप-५ मध्ये तीन भारतीय आहेत.

तर, पर्पल कॅपच्या शर्यतीत चेन्नई सुपर किंग्जचा मुस्तफिजुर रहमान अव्वल आहे. मुस्तफिजुरच्या नावावर २ सामन्यात ६ विकेट आहेत. 

यानंतर पंजाब किंग्जचा हरप्रीत ब्रार ३ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

तर मुंबईचा बुमराह, पंजाबचा रबाडा, हैदराबादचा नटराजन, चेन्नईचा दीपक चहर हे टॉप ५ मध्ये आहेत. या गोलंदाजांच्या नावावर प्रत्येकी ३-३ विकेट आहेत.  

रश्मिका मंदानाचे आगामी सिनेमे कोणते?