आतापर्यंत हे खेळाडू IPL मधून बाहेर

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 22, 2024

Hindustan Times
Marathi

आयपीएल २०२४ चा थरार आजपासून (२२ मार्च) रंगणार आहे. उद्घाटनाचा सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. 

पण स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक संघांना धक्का बसला. अनेक संघांचे मोठे खेळाडू दुखापतीमुळे किंवा त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे स्पर्धेत खेळणार नाहीत.

आतापर्यंत १४ खेळाडूंची नावे समोर आली आहेत जे या हंगामात खेळू शकणार नाहीत. 

या यादीत मोहम्मद शमीचाही समावेश आहे.

यानंतर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुड आयपीएल खेळणार नाही. तो लखनौच्या संघात आहे.

जेसन रॉयदेखील आपयीएल खेळणार नाही. तो कोलकाताकडून आयपीएल खेळतो.

दिल्ली कॅपिटल्सचा हॅरी ब्रूक यंदाच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही. गेल्या हंगामात तो हैदराबाकडून खेळला होता. 

याशिवाय ॲडम झम्पा राजस्थान रॉयल्सकडून यंदा खेळू शकणार नाही.

तर मथिषा पाथिराना यंदा चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये दिसणार नाही. बेबी मलिंगा हॅमस्ट्रिंगमुळे खेळणार नाही.

मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज दिलशान मधुशंका दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. 

तर चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ड्वेन कॉनवे मेपर्यंत मैदानात उतरू शकणार नाही.

दिलशान मधुशंकाशिवाय जेसन बेहरेनडॉर्फ हा देखील दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सचा भाग असणार नाही. 

तसेच, या यादीत गुजरातचा मॅथ्यू वेडचाही समावेश आहे. तोही दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही.

यानंतर राजस्थान रॉयल्सचा प्रसिध कृष्णा हादेखील आयपीएलमधून बाहेर झाला आहे.

केकेआरचा गस एटकिसनदेखील दुखापतीमुळे आयपीएल खेळणार नाही.

दिल्ली कॅपिटल्सचा फिल सॉल्ट दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे.

मुंबई इंडियन्सचा अनुभवी फलंदाज सूर्यकुमार यादव सुरुवातीच्या सामन्यांमधून बाहेर राहू शकतो. नुकताच तो फिटनेस टेस्टमध्ये फेल झाला होता.

महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?