सीएसकेच्या नव्या कॅप्टनचा पगार किती?

By Rohit Bibhishan Jetnavare
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

IPL २०२४ चा थरार सुरू झाला आहे. यंदाच्या आयपीएलआधी बरेच धक्कादायक निर्णय पाहायला मिळाले.

IPL सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी आपापले कर्णधार बदलले.

मुंबईने हार्दिक पांड्याला तर सीएसकेने ऋतुराज गायकवाडला कर्णधार बनवले आहे.

20सीएसेकेने ऋतुराजच्या नेतृत्वात RCB ला हरवत IPL 2024 ची शानदार सुरुवात केली.

पण, ऋतुराज गायकवाड कर्णधार झाल्यानंतर त्याचे आयपीएलचे मानधन किती असेल? याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

ऋतुराजला CSK चे नेतृत्व मिळाल्यानंतर त्याला धोनी इतकाच पगार मिळणार का? असे प्रश्न चाहत्यांच्या मनात निर्माण होत आहेत. 

कर्णधार झाल्यानंतर ऋतुराजच्या पगारात कोणतीही वाढ झालेली नाही. त्याला CSK कडून प्रत्येक मोसमासाठी ६ कोटी रुपये मिळतात.

कर्णधारपदाची जबाबदारी मिळाल्यानंतरही त्याचा पगार फक्त ६ कोटी रुपयेच राहणार आहे. तर धोनीला १२ कोटी रुपये मिळतात.

ऋतुराज गायकवाड हा IPL २०२४ मध्ये सर्वात कमी मानधन घेणारा कर्णधार आहे.  

मृणाल दुसानिसने अरेंज मॅरेज का केले?