भारतीय क्रिकेटर आणि त्यांचे युट्यूब चॅनेल

By Rohit Bibhishan Jetnavare
Dec 20, 2024

Hindustan Times
Marathi

भारतीय क्रिकेटपटू सहसा BCCI, स्पॉन्सरशिप डील आणि इन्व्हेस्टमेंट अशा माध्यमातून कमाई करतात. 

पण सध्या काही खेळाडू युट्युब चॅनलवरूनही प्रचंड कमाई करताना दिसत आहेत.

आकाश चोप्राने ऑगस्ट २०११ मध्ये यूट्यूब चॅनल सुरू केले. आता त्याचे ४७  लाख ५० हजार सबस्क्राइबर्स आहेत. तो क्रिकेट विश्लेषणाचे व्हिडिओ शेअर करतो.

आर अश्विनने एप्रिल २०२० मध्ये त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले. सध्या १६ लाख २० हजार लोकांनी हे चॅनेल सबस्क्राइब केले आहे. 

ऋषभ पंतने मे २०२४ मध्ये त्याचे यूट्यूब चॅनल सुरू केले. सध्या २ लाख ८० हजार लोक त्याचे सबस्क्राइबर्स आहेत. 

सचिन तेंडुलकरने सप्टेंबर २०१३ मध्ये यूट्यूबमध्ये प्रवेश केला. सध्या सुमारे १६ लाख ९० हजार लोक त्यांचे सबस्क्राइबर्स आहेत. 

जसप्रीत बुमराहने मार्च २०२४ मध्ये यूट्यूबवर पाऊल ठेवले. त्याच्या सबस्क्राइबर्सची संख्या ३ लाख ४०हजारांहून अधिक आहे.

बिग बॉस फेम मॉडेलचा अंगावर शहारे आणणारा बोल्डनेस