बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचं संपूर्ण वेळापत्रक  

By Rohit Bibhishan Jetnavare
Aug 19, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जेव्हा कधी कसोटी मालिका होते. तेव्हा त्याचा थरार वेगळाच असतो. दोन्ही संघांमध्ये जबरदस्त टक्कर होते. 

भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या जाणाऱ्या कसोटी मालिकेला बॉर्डर गावस्कर ट्रॉफी म्हणतात. 

ऑस्ट्रेलियाने २०१४-१५ मध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा शेवटचा पराभव केला होता. 

तेव्हापासून दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी मालिका झाल्या. २ भारतात आणि २ ऑस्ट्रेलियात. पण भारताने चारही मालिका २-१ अशा फरकाने जिंकल्या.

आता पुन्हा एकदा २०२४ मध्ये दोन्ही संघ बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये आमनेसामने येणार आहेत. यावेळी ही मालिका ऑस्ट्रेलियात होणार आहे. 

यंदापासून ही मालिका ५ सामन्यांची होणार आहे. बॉर्डर गावस्कर २०२४-२५ ट्रॉफी २२ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. 

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पहिली कसोटी – २२ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबरदरम्यान पर्थ येथे होईल.

यानंतर दुसरी कसोटी – ०६ डिसेंबर ते १० डिसेंबरदरम्यान ॲडलेड येथे होईल.

तर तिसरी कसोटी – १४ डिसेंबर ते १८ डिसेंबर या दरम्यान ब्रिस्बेन येथे होणार आहे.

चौथी कसोटी – २६ डिसेंबर ते ३० डिसेंबर – मेलबर्नमध्ये खेळली जाईल.

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाचवी आणि शेवटी कसोटी- ०३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान सिडनी येथे होणार आहे.  

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर