गाबाची पीच कशी असेल?
AFP
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 12, 2024
Hindustan Times
Marathi
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे.
मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. आता तिसरा सामना १४ डिसेंबरपासून ब्रिस्बेनच्या गाबा मैदानावर होणार आहे.
गाबाच्या पीचचा पहिला फोटोसमोर आला आहे. येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरू शकते, अशी शक्यता आहे.
वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीवरून वेग आणि उसळी मिळेल. याचाच अर्थ फलंदाजांच्या नशिबी अडचणी निश्चित येतील.
सुरुवातीच्या काळात येथे गोलंदाजांचे वर्चस्व राहील. येथे जो संघ चॉस जिंकेल, तो प्रथम गोलंदाजी करेल.
गाबाची पीच खूपच हिरवी दिसत आहे आणि त्यावर सतत रोलिंग केले जात आहे. पण दोन्ही संघात तगडे वेगवान गोलंदाज आहेत.
गाबाचे पीच क्युरेटर डेव्हिड सँडरस्की यांनी कबूल केले की सुरुवातीच्या सत्रात पीच गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरेल.
तसेच, प्रत्येक वेळी अशीच पीच तयार करतो, जेणेकरून चेंडू चांगला कॅरी करेल, वेग आणि बाउन्स मिळेल. गाबा अशाच पीचसाठी ओळखला जातो.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा