भारत-ऑस्ट्रेलिया डे-नाईट टेस्ट किती वाजता सुरू होणार?
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 05, 2024
Hindustan Times
Marathi
टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे.
या ट्रॉफीमध्ये ५ कसोटी सामने खेळले जाणार आहेत. यातील पहिला सामना पर्थ येथे झाला, जो भारताने २९५ धावांनी जिंकला.
टीम इंडियाने हा सामना रोहित शर्माच्या अनुपस्थितीत खेळला. जसप्रीत बुमराह कर्णधार होता.
आता कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या कसोटीतून पुनरागमन करत आहे. सोबतच शुभमन गिलही संघात कमबॅक करत आहे.
BGT ची दुसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवली जाईल. हा सामना दिवस-रात्र असेल, त्यामुळे सामन्याच्या वेळेतही बदल झालेला आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी ६ डिसेंबर ते १० डिसेंबर दरम्यान ॲडलेड येथे खेळवली जाणार आहे.
हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९.३० वाजता सुरू होईल. तसेच नाणेफेक सकाळी ९ वाजता होईल.
भारत-ऑस्ट्रेलिया दुसरी कसोटी टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर पाहता येईल तर लाईव्ह स्ट्रिमिंग हॉटस्टार ॲपवर होईल.
AFP
अमेरिकेत राष्ट्रपती रिटायर झाल्यावर काय काय सुविधा मिळतात ?
पुढील स्टोरी क्लिक करा