दीप्ती शर्माच्या बळावर भारताने वनडे मालिका जिंकली
By
Rohit Bibhishan Jetnavare
Dec 27, 2024
Hindustan Times
Marathi
भारतीय महिला संघाने तिसऱ्या वनडेत वेस्ट इंडिजचा ५ विकेट पराभव केला. यासह भारताने मालिका ३-० ने जिंकली.
वडोदरा येथे झालेल्या या सामन्यात ऑलराऊंडर दीप्ती शर्माने चमकदार कामगिरी केली.
तिने आधी गोलंदाजीत ६ विकेट्स घेतल्या आणि त्यानंतर फलंदाजीत महत्वपूर्ण ३९ धावांची खेळी केली.
दीप्तीने वनडेत तिसऱ्यांदा ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली. तिने एकता बिष्टचा रेकॉर्ड मोडला. बिष्टने दोनदा अशी कामगिरी केली होती.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने ३८.८ षटकांत सर्वबाद १६२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने २८.२ षटकांत लक्ष्य गाठले.
भारताकडून दीप्ती शर्माने नाबाद सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर हरमनप्रीत कौरने २२ चेंडूत ३२ धावा केल्या.
वेस्ट इंडिजकडून शीमन कॅम्पबेलेने ६२ चेंडूत ४६ धावांची चांगली खेळी केली. तर चिनले हेन्रीने ७२ चेंडूत ६१ धावा केल्या.
भारताकडून गोलंदाजीत दीप्ती शर्माने १० षटकांत ३१ धावा देत ६ बळी घेतले.
दीप्ती शर्माला सामन्यातील तसेच, मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले.
Enter text Here
पुढील स्टोरी क्लिक करा