देशभक्तीने ओतप्रोत असलेले ‘हे’ चित्रपट ओटीटीवर नक्की बघा!

By Harshada Bhirvandekar
Aug 13, 2024

Hindustan Times
Marathi

१९९७मध्ये रिलीज झालेल्या 'बॉर्डर' या चित्रपटाने लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर उपलब्ध आहे.

राजकुमार आणि नाना पाटेकर स्टार 'तिरंगा' हा चित्रपट तुम्ही ओटीटी प्लॅटफॉर्म 'झी ५'वर उपलब्ध आहे.

'एलओसी कारगिल' हा चित्रपट कारगिल युद्धावर आधारित आहे. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर पाहू शकता.

स्वातंत्र्यसैनिक मंगल पांडे यांच्या बलिदान आणि लढ्यावर आधारित आमिर खानचा 'मंगल पांडे' हा चित्रपट जिओ सिनेमावर पाहू शकता.

आमिर खान, सिद्धार्थ, सोहा अली खान, आमिर खान यांचा 'रंग दे बसंती' हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर बघता येईल.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांचा 'शेरशहा' हा चित्रपट विक्रम बत्रा यांच्या आयुष्यावर आधारित असून, तो प्राईम व्हिडीओवर बघू शकता.

आलिया भट्टचा 'राझी' हा चित्रपट एका अशा मुलीची कथा आहे, जी देशासाठी हेरगिरी करते. हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर बघू शकता.

अजय देवगणचा 'द लिजेंड ऑफ भगत सिंह' हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर बघता येऊ शकतो.

हृतिक रोशन आणि प्रीती झिंटा यांचा 'लक्ष्य' हा देशभक्तीपर चित्रपट नेटफ्लिक्सवर बघता येऊ शकतो.

पुलवामा हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकवर आधारित 'उरी' हा विकी कौशलचा चित्रपट 'झी ५'वर बघू शकता.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!