जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम

By Rohit Bibhishan Jetnavare
Dec 06, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेड येथे कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराहने मोठा विक्रम केला.

पिंक बॉल कसोटीत बुमराहने उस्मान ख्वाजाला रोहित शर्माकरवी झेलबाद केले. यासह बुमराहने यावर्षीची ५० वी कसोटी विकेट घेतली.

या विकेटसह बुमराह कपिल देव आणि झहीर खान यांच्या खास क्लबमध्ये प्रवेश केला. ज्यांनी एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट घेतल्या.

कपिल देव हा टीम इंडियाचा एकमेव वेगवान गोलंदाज आहे ज्याने एका कॅलेंडर वर्षात दोनदा ५० किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. 

कपिल देव यांनी १९७९ मध्ये ७४ विकेट्स घेतल्या. यानंतर १९८३ मध्ये त्यांनी एका कॅलेंडर वर्षात ७५ कसोटी विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.

भारतासाठी, झहीर खानने कसोटीत एकदा एका कॅलेंडर (२००२) वर्षात ५० किंवा त्याहून अधिक बळी घेण्याचा पराक्रमही केला आहे. 

यानंतर आता एका कॅलेंडर वर्षात ५० बळींचा आकडा गाठणारा जसप्रीत बुमराह हा भारताचा तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. 

अशा परिस्थितीत बुमराहने ॲडलेडमध्ये आणखी दोन विकेट घेतल्यास तो झहीर खानला मागे टाकेल.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी