भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. या मालिकेतील चौथा सामना मेलबर्न येथे खेळला गेला.
हा सामना पाहण्यासाठी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर लाखो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली.
मेलबर्नमधील या बॉक्सिंग डे कसोटीने ८७ वर्ष जुना विक्रम मोडला. डॉन ब्रॅडमन करिअरच्या शिखरावर सर्वाधिक प्रेक्षकांचा रेकॉर्ड झाला होता.
भारत-ऑस्ट्रेलिया हा कसोटी सामना पाहण्यासाठी पाचव्या दिवसापर्यंत ३,७३,६९१ प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले.
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीने १९३७ सालचा अॅशेस मालिकेतील सामन्याचा विक्रम मोडला.
20त्यावेळी त्या कसोटीत ६ दिवसांत ३,५०,५३४ प्रेक्षक सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये पोहोचले होते.
डॉन ब्रॅडमन यांनी त्या सामन्यात २७० धावांची खेळी केली होती. कांगारूंनी तो सामना ३६५ धावांनी जिंकला.
मात्र, आता हा विक्रम भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील थराराने मोडीत काढला आणि भारत-ऑस्ट्रेलिया लढत ॲशेसपेक्षाही मोठी असल्याचे दिसून आले.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी पाहण्यासाठी पहिल्याच दिवशी ८८ हजार प्रेक्षक स्टेडियमवर पोहोचले होते. पाचव्या दिवशी ६५ हजार लोक उपस्थित होते.