गाबा कसोटी किती वाजता सुरू होणार?  

By Rohit Bibhishan Jetnavare
Dec 13, 2024

Hindustan Times
Marathi

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ कसोटी सामन्यांची मालिका अतिशय रोमांचक वळणावर आहे. 

पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने २९५ धावांनी विजय मिळवला. 

त्यानंतर ॲडलेडमध्ये कांगारूंनी भारताचा १० विकेट्सनी धुव्वा उडवला. आता दोन्ही संघ तिसऱ्या सामन्यात आमनेसामने येतील.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना शनिवारपासून (१४ डिसेंबर) खेळला जाणार आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनमधील गाबा येथे खेळवला जाणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया तिसरी कसोटी भारतीय वेळेनुसार पहाटे ५.५० वाजता सुरू होईल. तर टॉस पहाटे ५.२० वाजता होईल.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर लाईव्ह पाहता येईल.

सोबतच भारत-ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीचे लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने हॉटस्टार ॲपवर पाहता येईल.

उफ्फ तेरी अदा! दिशा पटाणीच्या फोटोंची चर्चा