भगवान हनुमानाचा फोटो घरात कोणत्या दिशेला लावला?
By
Harshada Bhirvandekar
Mar 31, 2024
Hindustan Times
Marathi
भगवान हनुमान हे असे देव आहेत, जे कलियुगातही पृथ्वीवर विराजमान आहेत. मंगळवार हा दिवस हनुमानजींना समर्पित आहे.
भगवान हनुमानाची अनेक रूपे असून, त्यांच्या प्रत्येक रूपाचे चित्र घरात वेगवेगळ्या दिशेला लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात.
भगवान हनुमानाचा फोटो किंवा चित्र घरात कोणत्या दिशेला लावावे, हे जाणून घेऊया...
भगवान हनुमानाचा फोटो घरात नेहमी दक्षिण दिशेला लावावा, असे म्हणतात.
हनुमानजींचा प्रभाव हा दक्षिण दिशेला खूप असतो, असेही म्हटले जाते.
वास्तुशास्त्रानुसार असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. यामुळे घरावर कोणताही प्रभाव पडत नाही.
असे म्हटले जाते की, ज्या घरात पंचमुखी हनुमानाचा फोटो अथवा चित्र असते त्या घरात कोणत्याही प्रकारची समस्या येत नाही.
त्याचबरोबर घराच्या प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानचा फोटो लावल्यास वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाहीत.
वास्तुशास्त्रानुसार ज्या घरातील लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता आहे, अशा घरांमध्ये संजीवनी पर्वत उचलणाऱ्या हनुमानजींचा फोटो लावावा.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा