पाकिस्तान सुपर लीगचा अंतिम सामना (१८ मार्च) इस्लामाबाद युनाटेड आणि मुल्तान सुल्तान यांच्या खेळला गेला.
या सामन्यात इस्लामाबादने मुल्तानचा शेवटच्या चेंडूवर पराभव करत PSL चे जेतेपद जिंकले.
AFP
इस्लामाबादचा ऑलराउंडर इमाद वसीमने या सामन्यात चमकदार कामगिरी केली, ज्यामुळे त्याला सामनावीराचा किताब देण्यात आला.
इस्लामाबादने psl चे जेतेपद जिंकले, इमाद सामनावीर ठरला. पण यापेक्षा जास्त चर्चा इमादच्या एका वेगळ्याच कामाची होत आहे.
AFP
PSL फायनलमधील इमाद वसीमचा एक फोटो तुफान व्हायर होत आहे. फोटोत इमाद सिगारेट ओढताना दिसत आहे.
वास्तविक, सामन्यादरम्यान इमाद वसीम ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढताना दिसला. यामुळे त्याच्यावर टीका होत आहे.
इस्लामाबादचा संघ जेव्हा पहिल्या डावात फिल्डींग करत होता, तेव्हा इमाद ड्रेसिंग रूममध्ये सिगारेट ओढत होता. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
AFP
फायनलमध्ये मुल्ताने प्रथम फलंदाजी करताना १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इस्लामाबादने शेवटच्या चेंडूवर चौकार मारत विजय मिळवला.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान