स्वप्नात ‘या’ ४ गोष्टी दिसल्या तर मिळेल मोठे यश!
By
Harshada Bhirvandekar
Mar 19, 2024
Hindustan Times
Marathi
हिंदू धर्मात स्वप्न शास्त्राला खूप महत्त्व आहे. या शास्त्रानुसार प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ असतो.
आज आम्ही तुम्हाला अशा काही स्वप्नांबद्दल सांगणार आहोत, जे तुम्हाला यशाचे संकेत देतात.
जर, तुम्हाला स्वप्नात मुसळधार पाऊस किंवा झुळझुळ वाहणारी नदी दिसली, तर लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे.
जर, तुम्हाला स्वप्नात उंच डोंगर दिसला, तर समजा तुम्ही आयुष्यात लवकरच यशाची शिडी चढणार आहात.
याचा अर्थ असा की, तुम्ही ज्या कामासाठी निघाला आहात ते काम यशस्वी होणार आहे.
जर, तुम्हाला स्वप्न हिरवीगार झाडे, बाग किंवा फुले दिसली, याचा अर्थ तुमच्याकडे खूप पैसा येणार आहे.
तसेच स्वप्नात या गोष्टी दिसल्याने समाजात तुमचा सन्मान वाढणार आहे. तसेच पैशाची चणचण दूर होणार आहे.
स्वप्नात सूर्योदय दिसणे अतिशय शुभ मानले जाते. स्वप्नात सूर्योदय दिसण्याचा अर्थ तुम्हाला खूप सुख मिळणार आहे.
महाकुंभ मेळ्यानंतर कुठे जातात नागा साधू?
पुढील स्टोरी क्लिक करा