महाकुंभ मेळ्याला जाणे शक्य नसेल तर पुण्यपूर्ण स्नानासाठी घरीच करा हे उपाय

By Priyanka Chetan Mali
Jan 14, 2025

Hindustan Times
Marathi

महाकुंभ मेळा सुरू झाला असून, पौष पौर्णिमेला पहिले शाही स्नान आहे. असे मानले जाते की प्रयागराजच्या शाही स्नानात स्नान केल्याने पुण्य प्राप्त होते.

मात्र, असे काही लोक आहेत ज्यांना काही कारणास्तव महाकुंभाच्या शाही स्नानात सहभागी होता येत नाही. असे लोक घरी बसुन महाकुंभाचे पुण्य प्राप्त करु शकतात.

धार्मिक शास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी शाही स्नान केले जाते. अशा परिस्थितीत, सकाळी लवकर उठून आपल्या जवळच्या पवित्र नदी किंवा तलावात स्नानाला जाऊ शकतात.

जर तुमच्या आजुबाजूला पवित्र नदी नसेल तर घरातील स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिसळुन स्नान करा. यावेळी हर हर गंगा स्मरण करा. असे केल्याने पुण्य प्राप्त होते असे सांगितले जाते.

स्नान करतांना गंगा मातेसह देवाचे ध्यान करा आणि ॐ नम: शिवाय किंवा ॐ नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा.

कुंभमेळ्यात पाच वेळा स्नान करण्याचा नियम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही ५ वेळा डुबकी देखील घ्या आणि आंघोळ करतांना चुकूनही साबण, शॅम्पू यासारख्या गोष्टी वापरु नका.

आंघोळीनंतर लगेच स्वच्छ कपडे घालून सूर्यदेवाला जल अर्पण करा. यानंतर तुळशीला जल अर्पण करा.

सूर्यदेव आणि तुळशीला जल अर्पण केल्यानंतर घरातील पूजास्थानी बसावे. भगवान श्री हरी विष्णू, महादेव आणि इतर देवतांचे ध्यान करा.

महाकुंभात दानाला विशेष महत्व आहे. अशा परिस्थितीत गरीब किंवा गरजुंना अन्न, कपडे इत्यादी दान करा.

महाकुंभ हा आत्मशुद्धीचा आणि आत्मनिरिक्षणाचा उत्सव आहे. शाहीस्नानाच्या तिथीला दिवसभर उपवास करुन सात्विक भोजन करावे. असे केल्याने घरी बसून महाकुंभ स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होऊ शकते.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay