मला बाहेर यायचंय! ‘बिग बॉस मराठी ५’ची ‘ही’ स्पर्धक रडली!

By Harshada Bhirvandekar
Aug 11, 2024

Hindustan Times
Marathi

‘बिग बॉस मराठी सीझन ५'मध्ये एकामागोमाग एक अतिशय रंजक वळण येत आहेत.

या आठवड्याच्या 'बिग बॉस भाऊचा धक्का'मध्ये रितेश देशमुख याने स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली.

या आठवड्यात घरात चांगलीच धुसफूस पाहायला मिळाली आहे. मात्र, आता एका स्पर्धकाला रडू कोसळलं आहे.

‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वातील स्पर्धक योगिता चव्हाण या घरात उत्तम खेळ खेळताना दिसत आहे.

स्वतः रितेश देशमुख याने देखील योगिताच्या खेळाचं खूप कौतुक केलं.

मात्र, या कौतुकानंतर योगिता ढसाढसा रडू लागली आणि तिने घराच्या बाहेर येण्यासाठी विनंती केली.

मला या घरात खूप मानसिक त्रास होतो आहे म्हणून मला या घरातून बाहेर पडायचं आहे, असं योगिता म्हणाली.

योगिताला नक्की काय झालं आणि ती का असं रडली, असा प्रश्न तिच्या सगळ्या चाहत्यांना पडला आहे.

या आठवड्यात योगिता चव्हाण नॉमिनेशनमध्ये आहे. त्यामुळे ती खरंच बाहेर पडते का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!