माझा कुणी गॉडफादर नाही! प्राजक्ता माळी असं का म्हणाली?
By
Harshada Bhirvandekar
Aug 12, 2024
Hindustan Times
Marathi
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
सोशल मीडियावरही ती बऱ्यापैकी सक्रिय असल्याचे दिसते. प्राजक्ताचे लाखो चाहते दिवाने आहेत.
सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ शेअर करत प्राजक्ता चाहत्यांच्या संपर्कात राहते.
नुकताच प्राजक्ताचा ३५वा वाढदिवस झाला. ८ ऑगस्ट २०२४ रोजी प्राजक्ताने अगदी दणक्यात तिचा वाढदिवस साजरा केला.
‘फुलवंती’च्या माध्यमातून प्राजक्ताने निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकले. वाढदिवसाच्या निमित्ताने तिने याचे पोस्टर शेअर केले.
यावेळी पोस्टर शेअर करताना प्राजक्ता म्हणाली की, या इंडस्ट्रीत माझा कुणी गॉडफादर नाही.
तुम्ही सगळे प्रेक्षकच माझे मायबाप आहात. माझा आधारस्तंभ म्हणून माझ्यासोबत उभे राहा, असे आवाहन तिने केले.
मी निर्माती म्हणून नवीन इनिंग सुरू करत आहे. नेहमीसारखेच माझ्यासोबत राहा, असे प्राजक्ता माळी हिने म्हटले आहे.
अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा ‘फुलवंती’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ती या चित्रपटाची निर्माती देखील आहे.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा