हुंडईने आपली नवी मिनी एसयूव्ही Hyundai exter चा नवा टीझर जारी करून याची अधिकृत बुकिंग सुरु केली आहे.
यासाठी ग्राहक केवळ ११,००० रुपये भरून ही गाडी बुक करू शकतात.
Hyundai च्या अन्य मॉडलप्रमाणे यातही पॅरामॅट्रिक डिझाइन लँग्वेज दिले गेले आहे. यामध्ये स्पलिट हेडलँप सेट-अप, एच पॅटर्न एलईडी डे टाइम रनिंग लाइट्स मिळतात.
Hyundai exter मध्ये कंपनीने १.२ लीटर क्षमतेचा Kappa पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे.
या एसयूव्हीमध्ये कंपनीने सीएनजी व्हेरिएंटही सादर करण्याचे जाहीर केले आहे. या इंजिनला ५-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमेटिक गिअरबॉक्सने जोडले आहे.
Hyundai exter ला एकूण पाच व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. त्यामध्ये EX,S,SX,SX(O) आणि टॉप मॉडेलच्या रुपात SX(O कनेक्ट सामील आहे.
भारतीय कार बाजारात ही एसयूव्ही मुख्यत्वे Tata Punch सारख्या मॉडल्सशी स्पर्धा करेल.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान