खरेदी करताना पैशाची उधळपट्टी कशी टाळावी?

By Hiral Shriram Gawande
May 02, 2024

Hindustan Times
Marathi

इच्छा आणि गरज वेगवेगळी असतात. त्यामुळे इच्छेपेक्षा गरजेवर पैसा खर्च करा.

काही लोक कितीही घेतले तरी खरेदी करत राहतात. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानाने जगण्याची सवय झाली तर खर्च कमी होतील.

आकर्षक जाहिरातींना बळी पडून खरेदी करू नका. त्याआधी विचार करायला हवा

उत्सवासाठी शेवटच्या क्षणी खरेदी करण्याचा विचार करू नका.

ऑनलाइन ट्रान्सेक्शनचा जास्त वापर करण्याऐवजी रोख रक्कम हातात ठेवा.

इतरांनी आपलं कौतुक करावं असा विचार करून गोष्टी जमवू नयेत.

खरेदीसाठी घराबाहेर पडताना एक यादी तयार करा. फक्त ऑफर्स आहेत म्हणून जास्त खरेदी करू नका.

जास्त मीठ खाण्याचे परिणाम