घरच्या घरी व्हेज मेयोनीज कसं बनवाल?

By Harshada Bhirvandekar
Jan 21, 2025

Hindustan Times
Marathi

व्हेज मेयोनीज हा एक प्रकारचा सॉस आहे, जो सॅलड आणि सँडविचमध्ये वापरला जातो.

मेयोनीज घरच्या घरी देखील बनवले जाऊ शकते. नोट करा खास रेसिपी

व्हेज मेयोनीज बनवण्यासाठी काजू, मखाणा, चीज, लसूण, काळी मिरी, मीठ, आणि लिंबाचा रस हे साहित्य लागेल. 

सर्वप्रथम काजू आणि मखाणा तासभर भिजत ठेवा. 

आता एका मिक्सरच्या भांड्यात चीज, ६-७ लसूण पाकळ्या, भिजवलेले काजू, आणि मखाणा घेऊन बारीक वाटून घ्या.

मिश्रण बारीक झाले की, त्यात चवीनुसार मीठ आणि मिरपूड घालून पुन्हा बारीक वाटून घ्या.

आता या मिश्रणात लिंबाचा रस, आणि कोथिंबीर घालून सजवा. तयार आहे व्हेज मेयोनीज!

व्हेज मेयोनीज सँडविच, बर्गर, सॅलड आणि पराठे यांच्यासोबत सर्व्ह करा.

माघ पौर्णिमेला करा हे सोपे उपाय, वाढेल सुख-समृद्धी