कसा बनवायचा उडपी स्टाईल मेदू वडा? 

By Aiman Jahangir Desai
Dec 24, 2024

Hindustan Times
Marathi

आज आपण उडपी स्टाईल मेदू वड्याची सोपी रेसिपी पाहणार आहोत... 

साहित्य-१ वाटी धुतलेली उडीद डाळ, १ टीस्पून आले बारीक चिरून, १ टेबलस्पून कोथिंबीर बारीक चिरून, ३-४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, १/४ टीस्पून काळी,मिरी पावडर, एक चिमूटभर हिंग, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल

सर्वप्रथम उडीद डाळ पाण्यात ५ ते ६ तास भिजत ठेवा. डाळ फुगली की स्वच्छ पाण्याने धुवा.

आता डाळीत काळी मिरी, हिंग आणि मीठ घाला. हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक करून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

आता या पेस्टमध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि बारीक चिरलेले आले घाला. तसेच पेस्ट चांगली फेटून घ्या.

आता कढईत तेल गरम करून वडे बनवा. वडे सहज तयार करण्यासाठी प्लास्टिकचे हातमोजे घाला आणि हाताला तेल लावा. असे केल्याने वडे बनवणे खूप सोपे होईल.

वडा प्रथम मोठ्या आचेवर आणि नंतर मंद आचेवर तळून घ्या. वडा हलका तपकिरी रंगाचा झाला की कढईतून काढून टिश्यू पेपरवर ठेवा.

यानंतर तुम्ही गरमागरम वडे सांबार आणि चटणीसोबत सर्व्ह करू शकता.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!