झटपट बनवा तिळाचे लाडू!

By Harshada Bhirvandekar
Dec 10, 2024

Hindustan Times
Marathi

थंडीच्या काळात शरीराला उबदार ठेवणाऱ्या अनेक गोष्टी खाल्ल्या जातात. त्यापैकीच एक म्हणजे पांढरे तीळ. या तिळापासून लाडू देखील बनवले जातात.

आज आम्ही तुम्हाला तिळाचे लाडू बनवण्याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत, जी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता.

तिळाच्या लाडूसाठी लागणारे साहित्य : एक कप तीळ, दोन कप गूळ, पाव कप पाणी, एक चमचा तूप आणि काजूचे काप

स्टेप १ : सुरुवातीला तीळ मध्यम आचेवर  भाजून घ्या. पांढऱ्या तिळाचा रंग हलका सोनेरी झाला आणि त्यातून खमंग वास येऊ लागला की गॅस बंद करा.

स्टेप २ : दुसऱ्या एका भांड्यात गुळ आणि पाणी घालून  पाक तयार करून घ्या. 

स्टेप ३ : या पाकात भाजलेले तीळ, तूप आणि किसून घेतलेले किंवा काप केलेले काजू घालून मिश्रण व्यवस्थित मिसळा.

स्टेप ४ : मिश्रण थोडेसे थंड झाले की, हाताने लाडूच्या आकाराचे गोळे बनवा.हे लाडू थोडा वेळ थंड होऊ द्या आणि नंतर सर्व्ह करा.

तिळाचे हे लाडू तुम्ही बरणीत भरून ठेवू देखील शकता.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!