झणझणीत शेवभाजी कशी बनवायची?
By
Harshada Bhirvandekar
Jan 03, 2025
Hindustan Times
Marathi
झणझणीत शेवभाजी खायला तर मस्त लागतेच, पण ही बनवायला देखील सोपी आहे.
शेवभाजीसाठी लागणारे साहित्य : २ कप शेव, १ कप टोमॅटो, १ कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, लाल मसाला, मीठ
कांदे बारीक कापून तेलात खरपूस भाजून घ्या. त्यात आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची घालून परतून घ्या.
यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि मसाले घालून व्यवस्थित शिजवून घ्या.
टोमॅटो नीट शिजले आणि ग्रेव्ही सदृश्य झाले की, त्यात शेव घालून व्यवस्थित मिसळून घ्या.
आता यात थोडे पाणी घालून भाजी मध्यम आचेवर शिजू द्या.
वरून कोथिंबीर, गरम मसाला घालून भाजीचा स्वाद आणखी वाढवा.
यात थोडासा लिंबाचा रस मिसळून चपाती आणि भातासोबत सर्व्ह करा.
प्रिया सरोज कोण आहे?
पुढील स्टोरी क्लिक करा