झणझणीत मिरचीचा ठेचा कसा बनवायचा?

By Aiman Jahangir Desai
Jan 21, 2025

Hindustan Times
Marathi

साहित्य- १०० ग्रॅम हिरव्या मिरच्या, ४-५ चमचे शेंगदाणे, ३ टीस्पून लसूण, १/३ कप कोथंबीर,४ चमचे तेल, चवीनुसार मीठ

सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या आणि लसूण स्वच्छ करा. हिरव्या मिरच्यांचे देठ तोडून आणि लसूण सोलून घ्या.

शेंगदाणा ३-४ मिनिटे मंद आचेवर भाजून घ्या. थंड झाल्यावर ते मॅश करा आणि शेंगदाण्याची साल वेगळी करा.

हिरव्या मिरच्या आणि कोथंबीर जाडसर चिरून घ्या.

कढईत तेल घालून ते गरम करा. त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या घाला आणि झाकण ठेवून सुमारे २ मिनिटे शिजवा, नंतर लसूण घाला आणि १ मिनिट शिजवा. गॅस बंद करा आणि प्लेटमध्ये काढा.

थंड झाल्यावर त्यात मीठ आणि शेंगदाणे घाला आणि ते खलबत्यात वाटून घ्या किंवा पाणी न घालता मिक्सरमध्ये बारीक करा. तोंडाला पाणी आणणारा मसालेदार ठेचा तयार आहे.

महाकुंभमेळ्यात अभिनेत्रीनं केलं पवित्र स्नान, तुम्ही ओळखलं का?