साहित्य-१ वाटी नारळ खिस,२ कांदे, ५ लसूण पाकळ्या,आले,
१/४ वाटी तेल, १ कांदा चिरलेला,१ टोमॅटो चिरलेला १ टीस्पून आले लसूण पेस्ट,२ चमचे लाल तिखट, १/२ टीस्पून हळद पावडर, टीस्पून धने,जिरे पावडर,
१ टीस्पून कोल्हापुरी मसाला, चवीनुसार मीठ
आवश्यकतेनुसार कोथिंबीर, १ वाटी भिजवलेले मोड,आवश्यकतेनुसार लोणी, आवश्यकतेनुसार पाव, चवीनुसार फरसाण, लिंबू
ग्रेव्हीसाठी: कढईत चिरलेला कांदा, तेल घालून परतून घ्या. नंतर नारळाची खिस टाका आणि लालसर होईपर्यंत तळा. ते थंड करून मिक्सरमध्ये वाटून घ्या. कुकरमध्ये भिजवलेली मटकी शिजवून घ्या.
कढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग, चिरलेला कांदा, टोमॅटो टाका. मऊ होईपर्यंत भाजून घ्या.
आता त्यात आलं लसूण पेस्ट, तिखट, धनजीरा पावडर, हळद घालून परतून घ्या. त्यानंतर पाण्यात शिजवलेली मटकी घाला.
उकळल्यानंतर मिक्सरमध्ये केलेली पेस्ट घाला. चांगले उकळू द्या. आता हे मिश्रण तयार आहे.
कांदा आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या. लिंबाचे तुकडे करा. आता गरमागरम मिसळ, फरसाण, कांदा, लिंबू आणि पाव सोबत सर्व्ह करा.