या हिवाळ्यात गरम गरम रस्सम वडे खायला मिळाले तर, त्याची चव वेगळीच असते. हा पदार्थ घरी देखील करू शकता.
freepik
वडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य : उडीद डाळ- १ वाटी, आले- १ इंच, हिरव्या मिरच्या- १, किसलेले खोबरे- १ टीस्पून, थोडी कोथिंबीर, मिरची- ४ ते ५, मीठ, तळण्यासाठी तेल.
freepik
रस्समसाठी लागणारे इतर साहित्य : शिराळं- पाव कप, टोमॅटो- २, चिंच, रस्सम पावडर- १ टीस्पून, कढीपत्ता, मोहरी- १ टीस्पून, जिरे- अर्धा टीस्पून, हळद- चिमूटभर, मिरची पावडर- अर्धा चमचा, मीठ, धणे, लसूण, तेल.
कृती : प्रथम उडीद डाळ ३-४ तास भिजत ठेवा. डाळीत आले, हिरवी मिरची आणि मीठ घालून जाडसर पीठ वाटून घ्या.
freepik
या मिश्रणात थोडी चिरलेली कोथिंबीर, किसलेले खोबरे आणि ठेचलेली मिरची घाला आणि मिक्स करत रहा.
freepik
रस्सम बनवण्यासाठी प्रथम शिजलेले टोमॅटो, जिरे, मिरपूड घालून बारीक करा.
freepik
कढईत फोडणी करून त्यात टोमॅटोचे मिश्रण घाला. नंतर त्यात चिंच, कोथिंबीर, गूळ, रस्सम पावडर, तिखट, मीठ घालून शिजू द्या.
आता एका कढईत तेल उकळवून डाळीच्या मिश्रणापासून वडे थापून तेलात चांगले तळून घ्या.
freepik
रस्सम तयार झाल्यावर एका मोठ्या वाटीत वडे घेऊन त्यावर रस्सम घाला आणि गरमागरम सर्व्ह करा.