पांढरा रस्सा करण्यासाठी प्रथम कुकरमध्ये चिकन, आले-सुण पेस्ट, मीठ, किंचित हळद जास्त पाणी टाकुन कुकरच्या६-७ शिट्टया शिजवुन घ्या.
नंतर चिकनचे पाणी गाळून वाटी मध्ये ठेवा. ओल्या नारळाचे बारीक तुकडे करून भरपुर पाणी मिक्स करून पेस्ट करा व पातळ कपडयाने घट्ट नारळाचे दुध काढुन ठेवा.
काजु, बदाम, पांढरे तीळ, खसखस२-३ तास पाण्यात भिजत ठेवा नंतर बदामाची साल काढुन सगळ्या साहित्याची पाणी मिक्स करून बारीक पेस्ट करून घ्या.
नंतर चिकन स्टॉक मध्ये नारळाचे दुध व काजु बदाम तीळ खसखशीची पेस्ट मिक्स करा.
पातेल्यात साजुक तुप गरम झाल्यावर त्यात जीरे व सर्व खडा मसाला टाकुन परता नंतर त्यात उभ्या चिरलेल्या मिरच्या, व आललसुण पेस्ट परतुन त्यात वरील मिश्रण मिक्स करून गरम करून घ्या.
गॅस बंद करून चविनुसार मीठ मिक्स करून ढवळुन घ्या आपला कोल्हापुरी पांढरा रस्सा तयार आहे.