लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच पनीरची भाजी भरपूर आवडते. ही भाजी जितकी स्वादिष्ट आहे तितकीच पौष्टिक देखील आहे.
मटर पनीर पासून ते पनीर बटर मसाला आणि कढाई पनीरपर्यंत वेगवेगळ्या रेसिपी वापरून पनीरची भाजी बनवली जाते.
‘कढाई पनीर मसाला’ या भाजीची चव आणखी वाढवण्यासाठी तुम्ही घरच्या घरी सीक्रेट मसाला तयार करू शकता.
कढाई पनीर बनवण्यासाठी लागणाऱ्या सीक्रेट मसाल्यात २ चमचे धणे, ३ लाल मिरच्या, २ तमालपत्र, अर्धा चमचा काळी मिरी, अर्धा चमचा बडीशेप आणि चार लहान वेलच्या हे साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी हे सर्व मसाले मंद आचेवर नीट भाजून घ्या आणि नंतर त्याची बारीक पूड वाटून घ्या.
कढई पनीर बनवताना एक किंवा दीड चमचे हा मसाला ग्रेव्हीमध्ये मिसळा आणि थोडा वेळ चांगला भाजून घ्या.
यानंतर ग्रेव्ही मसाल्यात पनीर घालून, वरून कोथिंबीरने सजवून गरमागरम चपाती किंवा पराठ्यांसोबत सर्व्ह करा.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान