हॉटेल स्टाईल टोमॅटो सूप घरी कसं बनवायचं?
By
Harshada Bhirvandekar
Dec 11, 2024
Hindustan Times
Marathi
थंडीच्या मोसमात गरमागरम टोमॅटो सूप चवदार लागते आणि ते आरोग्यदायी देखील आहे.
हॉटेलसारखे टोमॅटो सूप तुम्ही घरी देखील बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला याची एक सोपी रेसिपी सांगणार आहोत.
टोमॅटो सूप बनवण्यासाठी टोमॅटो, लसूण, कांदा, बटर, मीठ, काळी मिरी, साखर, क्रीम आणि कोथिंबीर हे साहित्य लागणार आहे.
सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुऊन कापून घ्या. त्यासोबतच लसूण आणि कांदा देखील बारीक चिरून घ्या.
नंतर एका खोलगट तव्यात बटर गरम करा आणि त्यात चिरलेला लसूण आणि कांदा सोनेरी होईपर्यंत तळसून घ्या.
नंतर यात चिरलेला टोमॅटो घाला आणि मऊ होईपर्यंत शिजवा. नंतर मीठ आणि मिरपूड घाला. मिश्रण थोडं थंड झाल्यावर वाटून गाळून घ्या.
गाळलेले मिश्रण पुन्हा गरम करा. त्यात थोडी मीरपूड आणि पाव चमचा साखर घाला. वरून थोडीशी क्रीम घाला आणि पाच ते दहा शिजू द्या.
तयार आहे तुमचं गरमागरम सूप... वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करा. या सूपसोबत तुम्ही ब्रेड देखील सर्व्ह करू शकता.
लाईमलाईटपासून दूर राहतात 'या' बॉलिवूड वाईफ्स!
पुढील स्टोरी क्लिक करा