बिना अंड्याचा चोको लावा केक कसा बनवाल?

By Harshada Bhirvandekar
Nov 28, 2024

Hindustan Times
Marathi

चोको लावा केक हा कप केकसारखा असतो. या केकच्या मध्यभागी वितळवलेले चॉकलेट असते.

तुम्ही हा केक घरच्या घरी बनवू शकता. बिना अंड्याचा चोको लावा केक कसा बनवायचा जाणून घेऊया.

साहित्य : मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, साखर, दूध, व्हॅनीला ईसेन्स, बटर, चॉको चिप्स

स्टेप १ : सगळ्यात आधी मैदा, कोको पावडर, बेकिंग पावडर, आणि बेकिंग सोडा चाळून घ्या. 

स्टेप २ : आता एका मोठ्या खोलगट भांड्यात साखर, वितळवलेले बटर, दूध, व्हॅनीला ईसेन्स एकत्र फेटून घ्या. 

स्टेप ३ : फेटलेल्या बटरच्या मिश्रणात मैदा आणि इतर चाळून घेतलेले साहित्य मिसळा.हे मिश्रण केक मोल्डमध्ये ओतून मध्यभागी चॉकोचिप्स टाका.

स्टेप ४: प्री-हिटेड ओव्हनमध्ये २०० डिग्रीवर १०-१२ मिनिटांसाठी बेक करा.

स्टेप ५ : बेक झाल्यानंतर गरमा गरम खाण्यास सर्व्ह करा.

सोनाली कुलकर्णीचं फोनबुथ फोटोशूट