कुरकुरीत मेथीची भजी कशी बनवायची?

Pinterest

By Harshada Bhirvandekar
Feb 06, 2025

Hindustan Times
Marathi

संध्याकाळी चहासोबत कुरकुरीत पकोडे खायला बहुतेकांना आवडतात. मेथी घालून बनवलेली हेल्दी आणि कुरकुरीत पकोडा रेसिपी नोट करा.

Pinterest

मेथीचे पकोडे बनवणे खूप सोपे आहे. ते कसे बनवायचे जाणून घ्या... 

Pinterest

साहित्य : १ वाटी चण्याच्या डाळीचे पीठ, अर्धी वाटी मेथी, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा मिरची पावडर, पाव चमचा जिरेपूड, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा खाण्याचा सोडा, मीठ, पाणी, तळण्यासाठी तेल.

Pinterest

चण्याचे पीठ, हळद, लाल तिखट, जिरेपूड, गरम मसाला, खाण्याचा सोडा आणि मीठ एकत्र करा.

Pinterest

नंतर बारीक चिरलेली मेथी घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ चांगले मिक्स करा.

Pinterest

स्टोव्हवर कढई ठेवा आणि तेल घाला. तेल गरम झाल्यावर पिठाचे छोटे छोटे गोळे एक एक करून तळून घ्या.

Pinterest

भजी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.

Pinterest

एका प्लेटमध्ये टिश्यू पेपर ठेवून त्यावर तळलेले पकोडे ठेवा. लसूण चटणी किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

Pinterest

मेथी आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा.

Pinterest

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान