साहित्य- ५०० ग्रॅम चिकन, १ टेबलस्पून आले लसूण पेस्ट, १ टीस्पून मिरची पावडर, २ चमचे कॉर्नफ्लोर, २ चमचे मैदा
चवीनुसार मीठ, १ टीस्पून धने पावडर, २ टीस्पून लिंबाचा रस, तेल (तळण्यासाठी), १अंडे, १ टीस्पून काळी मिरी पावडर, कढीपत्ता, २/३ लसूण पाकळ्या चिरून
१ टेबलस्पून चिली सॉस, १ टेबलस्पून टोमॅटो सॉस, १/२ टीस्पून सोया सॉस
१/२ टीस्पून जिरे पावडर, २ हिरव्या मिरच्या चिरलेल्या, १ चिमूटभर लाल फूड कलर , १ टीस्पून गरम मसाला पावडर, १/२ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
चिकनमध्ये मीठ, तिखट, आले लसूण पेस्ट, अंडी, कॉर्नफ्लोअर, मैदा आणि लिंबाचा रस घालून मिक्स करून ३० मिनिटे ठेवा.
आता एका खोलगट कढईत तेल गरम करा आणि चिकन तळून घ्या.
दुसऱ्या कढईत थोडे तेल टाकून त्यात कढीपत्ता घाला.
त्यात चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची घालवून हलवून घ्या.
आता त्यात चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, मीठ, मिरची पावडर, धनेपूड, मीठ घालून मिक्स करा.
सर्व मसाले नीट मिक्स केल्यानंतर त्यात चिकन घालून मिक्स करा.
एक चिमूटभर फूड कलर, गरम मसाला आणि लिंबाचा रस घालून चांगले मिसळा. तयार आहे ६५.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान