बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?

By Harshada Bhirvandekar
Dec 03, 2024

Hindustan Times
Marathi

झिरो ऑइल कुकिंग म्हणजेच तेलाशिवाय स्वयंपाक करण्याचा ट्रेंड सध्या वाढू लागला आहे. अशा प्रकारच्या अनेक पाककृती सोशल मीडियावर व्हायरल होतात.

आम्ही देखील तुम्हाला आज तेल आणि क्रीम न वापरता दाल मखनी कशी बनवायची याची एक सोपी आणि चविष्ट रेसिपी सांगणार आहोत.

त्यासाठी लागणारे साहित्य भिजवलेला राजमा, अख्खे उडीद,  टोमॅटो, आलं, लसूण, हिरवी मिरची, गरम मसाला, हळद, तिखट, मीठ. 

स्टेप १ : सगळ्यात आधी भिजवलेला राजमा, अख्खे उडीद उकडून घ्या. त्यानंतर टोमॅटो, आलं, लसूण आणि हिरवी मिरची यांची बारीक पेस्ट तयार करून घ्या. 

स्टेप २ : आता एका नॉनस्टिक पॅनमध्ये अर्धा चमचा जिरे घालून ते चांगले भाजून घ्या  आणि त्यावर टोमॅटोची पेस्ट घालून मंद आचेवर थोडा वेळ  परतून घ्या.

स्टेप ३ : टोमॅटोची पेस्ट थोडीशी शिजली की, त्यात सर्व मसाले घालून थोडा वेळ आणखी परतून घ्या. यात थोडेसे पाणी देखील घाला म्हणजे मसाले जळणार नाहीत.

स्टेप ४ : आता या मिश्रणात उकडलेला राजमा आणि  उडीद घाला आणि चांगले मिसळून घ्या.

तयार आहे तुमची चविष्ट दाल मखनी... यात वरून कोथिंबीर घालून आणि थोडेसे क्रीम घालून तुम्ही ही दाल मखनी सर्व्ह करू शकता.

लहान मुलांसाठी बनवा चॉकलेट चिक्की!