लग्नाच्या वेळी किती होते राम आणि सीतेचे वय?
By
Harshada Bhirvandekar
Apr 16, 2024
Hindustan Times
Marathi
भगवान राम आणि माता सीता हे कोट्यावधी लोकांचे दैवत आहेत.
आपण लहानपणापासूनच यांच्या बद्दल अनेक दंतकथा आणि पुरणकथा ऐकल्या आहेत.
मात्र, माता सीता आणि भगवान रामाबद्दल अनेकांना वेगवेगळे प्रश्न पडलेले असतात.
यापैकीच एक प्रश्न म्हणजे त्यांचे लग्न झाले, तेव्हा त्यांचे वय काय होते?
प्रत्येक पती-पत्नीमध्ये प्रभू राम आणि माता सीतेप्रमाणे प्रेम आणि विश्वास हवा, असं म्हटलं जातं.
माता सीतेसोबत विवाहासाठी आयोजित करण्यात आलेल्या स्वयंवरात भगवान श्रीरामांनी शिवाचे धनुष्य मोडून मातेला वरलं होतं.
रामचरितमानसमध्ये एक श्लोक लिहिला आहे, ज्यात प्रभू राम आणि माता सीता यांच्या वयातील फरक सांगितला आहे.
लग्नाच्या वेळी माता सीता आणि भगवंतराव यांच्यात आठ वर्षांचे अंतर होते.
गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान
पुढील स्टोरी क्लिक करा