‘ठरलं तर मग’साठी जुई गडकरीला किती पैसे मिळतात?
All Photos: Instagram
By
Harshada Bhirvandekar
Apr 24, 2024
Hindustan Times
Marathi
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री जुई गडकरी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.
जुई गडकरी हिने 'पुढचं पाउल' या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनाला भुरळ पाडली होती.
आता 'ठरलं तर मग' या मालिकेतून ती पुन्हा एकदा महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली आहे.
आता छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या 'ठरलं तर मग' या मालिकेत ती ‘सायली’च्या भूमिकेत दिसत आहे.
या मालिकेतील सायली आणि अर्जुन सुभेदार यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.
या मालिकेनंतर जुईच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. जुई गडकरी सोशल मीडियावरदेखील सक्रिय असते.
जुई चाहत्यांच्या प्रश्नांना देखील उत्तर देते. आता तिला एकाने विचारलं की, मालिकेतून किती पैसे मिळतात?
यावर उत्तर देताना जुई म्हणाली की, ‘महिन्याचा खर्च निघून जातो आणि माग थोडेफार हातात उरतात एवढा पगार आहे मला’.
जुई गडकरी ‘ठरलं तर मग’ या मालिकेसाठी दिवसातले तब्बल १३ तास काम करते. तर, यासाठी २ ते २.३० प्रवास देखील करते.
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा