एका राज्यातून दुसऱ्या राज्यात किती प्रमाणात दारू घेऊन जाता येऊ शकते ? जाणून घेऊयात लिमिट 

By Ninad Vijayrao Deshmukh
Mar 20, 2024

Hindustan Times
Marathi

दारू संदर्भात वेगवेगळ्या राज्यात विविध नियम असतात. कोण किती दारू परराज्यातून आणू शकतात याचे देखील नियम असतात. 

दारू घरी ठेवण्याचे देखील विविध राज्यात अनेक नियम आहेत. एका लिमिट पेक्षा अधिक दारू घरी ठेवता येत नाही.

रेल्वेच्या नियमानुसार प्रवास करतांना दारूची बॉटल घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच सेवणावर देखील मनाई करण्यात आली आहे. 

ज्या राज्यात दारूबंदी आहे, त्या राज्यात तुम्ही दारूची एक बॉटल देखील घेऊन जाऊ  शकत नाहीत

ज्या राज्यात दारू बंदी नाही त्या राज्यात तुम्ही एक लीटर पेक्षा अधिक दारू घेऊन जाऊ शकत नाहीत. 

जर तुम्ही ठरवून दिलेल्या मात्रेपेक्षा दारू घेऊन जात असाल तर तुम्हाला नियमा प्रमाणे आर्थिक दंड अथवा शिक्षा होऊ शकते. 

दिल्ली मेट्रो मध्ये एक व्यक्ति दोन सीलबंद दारूच्या बाटल्या त्याच्या सोबत घेऊन जाऊ शकतो.  पण तुम्ही विमानतळाच्या एयरपोर्ट लाइन पर्यन्तच दारूच्या बॉटल्स घेऊन जाऊ शकता. 

काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...