बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या स्टारकिड्सचं शिक्षण किती?

By Harshada Bhirvandekar
Jan 07, 2025

Hindustan Times
Marathi

रविना टंडन हिची मुलगी राशा थडानी ही 'आझाद' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

राशा हिने धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता ती अभिनयात आली.

वीर पहाडिया 'स्काय फोर्स'मधून मोठ्या पडद्यावर येणार असून, त्याने बोस्टन कॉलेजमधून पदवी घेतली आहे.

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या आहान पांडे याचे मुंबईच्या ओबेरॉय स्कूलमधून शिक्षण झाले आहे.

अक्षय कुमारची भाची सिमर भाटीया लवकरच बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार आहे. तिने अभिनयाचे शिक्षण घेतले आहे.

अजय देवगणचा भाचा अमान देखील 'आझाद'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याचे पदवी शिक्षण झाले आहे.

इब्राहीम अली खान 'सरजमीं'मधून डेब्यू करणार आहे. सगळेच त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. 

त्याने  धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले. त्याने न्यूयॉर्कमधून फिल्म मेकिंगचे शिक्षण घेतले.

अभिनेत्री शनाया कपूर देखील यावर्षी डेब्यू करणार आहे. तिचे २ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतील.

शनायाने इकॉले मोंडीएल वर्ल्ड स्कूलमधून शिक्षण घेतली आणि लंडनमधून पदवी शिक्षण घेतलं. 

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी