बटाट्याच्या सालमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, लोह, फायबर, व्हिटॅमिन बी ३ असते. अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की यात डायटरी फायबर, अँटिऑक्सिडंट्स, फिनोलिक संयुगे आणि खनिजे देखील असतात.
Pexels
बटाट्याच्या सालीतील हाय डायटरी फायबरमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते. बटाट्याच्या सालमधील पोटॅशियम हृदयविकार टाळण्यास मदत करते.
pixabay
जर तुमच्या डोळ्यांखाली डार्क सर्कल असतील किंवा त्वचा उन्हामुळे टॅन झाली असेल तर बटाट्याची साल मॅश करून त्याचा रस चेहऱ्यावर लावा. काळेपणा लवकरच दूर होईल.
Pexels
बटाट्याच्या सालमध्ये लोह असते. त्यामुळे सालसकट बटाटा खाल्ल्याने ॲनिमिया नियंत्रित होतो.
Pexels
बटाट्याच्या सालमध्ये व्हिटॅमिन बी३ भरपूर प्रमाणात असते. यातील नियासिन कार्बोहायड्रेट्सचे ऊर्जेत रूपांतर करते.
Pexels
यात फायबरचे प्रमाणही जास्त असते. हे पचनसंस्था मजबूत करण्याचेही काम करते.
Pexels
जर तुमचे केस पांढरे असतील तर अर्धा लिटर पाण्यात १ वाटी बटाट्याची साल उकळा. ते पाणी केसांना लावा.
Pexels
आता बटाट्याची साल फेकू नका तर त्याचा अशा प्रकारे वापर करा.