भगवान श्रीकृष्णाला किती मुले होती?

By Priyanka Chetan Mali
Feb 03, 2025

Hindustan Times
Marathi

धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णाला ८ बायका होत्या. यामुळे यांना अष्टा भार्या म्हटले जायचे असे सांगितले जाते.

श्रीकृष्णाला ८० मुलं होती. प्रद्युम्न, चारुदेष्ण, सुदेष्ण, चारूदेह, सुचारू, चरुगुप्त, भद्रचारू, चारुचंद्र, विचारू आणि चारू रुक्मिणीचे पुत्र होते.

सांब, सुमित्र, पुरुजित, शतजित, सहस्रजित, विजय, चित्रकेतु, वसुमान, द्रविन् आणि कृतु हे जांबवतीचे पुत्र होते.

भानु, सुभानु, स्वभानु, प्रभानु, भानुमान, चंद्रभानु, बृुहद् भानु, अतिभानु, श्रीभानु आणि प्रतिभानु सत्यभामाचे पुत्र होते.

श्रुत, कवि, वृ़ष-२, वीर-२, सुबाहु, भद्र, शांती, दर्श, पूर्णमास आणि सोमक कालिंदीची मुले होती.

वृक, हर्ष, अनिल, गृध्र, वर्द्धन, अन्नद, महश, पावन, वन्हि आणि क्षुधि मित्रवंदाची मुले होती.

प्रबोध, गात्रवान, सिंह, बल, प्रबल, ऊर्ध्वग, महाशक्ती, सह, ओज आणि अपराजित यांचा लक्ष्मणाच्या गर्भातून जन्म झाला होता.

वीर, चंद्र, अश्वसेन, चित्रगु, वेगवान, वृ़ष, आम, शंकु, वसु आणि कुंती हे सत्याची मुले होती.

संग्रामजित, बृहत् सेन, शूर, प्रहरन्, अर्जित, जय, सुभद्र, वाम, आयु आणि सत्यक भद्राचे मुले होती.

डिस्क्लेमर : ही माहिती केवळ धार्मिक श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही.

लिंबाचे सरबत

नाश्ता करण्याआधी लिंबू पाणी प्यायल्याचे फायदे

PEXELS