बंगळुरू येथील एआय अभियंता अतुल सुभाष यांच्या आत्महत्येनंतर सोशल मिडियासह संपूर्ण भारतात त्यांना न्याय देण्याची मागणी केली जाऊ लागली आहे.
अतुल सुभाष यांनी व्हिडिओ आणि सुसाइड नोटमध्ये त्यांच्या पत्नी व सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा आरोप करत जीवन संपवलं आहे.
अतुल सुभाष यांनी लिहिलेल्या सुसाइड नोट आणि व्हिडिओच्या आधारावर अतुलच्या भावाने बंगरुळू पोलिसांत सासरच्या मंडळी विरोधात छळ केल्याचा आणि आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे जर सुसाइड नोटमध्ये कुणाचे नाव असल्यास त्याच्यावर कोणत्या कलमा खाली आणि काय कारवाई होऊ शकते ? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल, त्यामुळे या बाबत आपण माहिती घेऊयात.
अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणी बेंगळुरू पोलिसांनी भारतीय न्याय संहिता बीएस कलम १०८ आणि ३ (५) नुसार गुन्हा दाखल केला आहे.
जर कुणी सुसाइड नोटमध्ये कुणाचे नाव लिहिले असेल तर त्याच्यावर कमल १०८ नुसार गुन्हा दाखल करण्यात येतो.
जर संबंधित व्यक्तिवर गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला कलम १०८ नुसार १० वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा होऊ शकते. तसेच दंड देखील भरावा लागू शकतो.
फक्त सुसाइड नोटमध्ये नाव असल्याने त्या व्यक्तीला दंडित केल्या जाऊ शकत नाही. या पूर्वी त्याच्यावर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यात तो दोषी आढळल्यास कारवाई केली जाऊ शकते.
पोलिस सुसाइड नोटची सत्यता आणि आणि लावण्यात आलेल्या आरोपांची तथ्यात्मक तपास करतात.
सुसाइड नोटची सत्यता आणि आणि लावण्यात आलेल्या आरोपांची तथ्यात्मक तपासणी नंतर कोर्टात खटला चालतो. यानंतर आरोप सिद्ध झाल्यास शिक्षा सुनावली जाते.