सिगरेट व धूम्रपान मानवी आरोग्यास हानिकारक आहे. मात्र, आता सिगरेटच्या फिल्टरमुळे देखील पर्यावरणाला धोका पोहोचतोय.
सिगरेटचे फिल्टर हे सेल्युलोज एसीटेट नामक प्लॅस्टिक पासून तयार करण्यात येतं. जेव्हा सिगरेटचे फिल्टर फेकून दिले जाते तेव्हा प्लॅस्टिकसह निकोटीन व अन्य रसायनामुळे जमिनीचे व पर्यावरणाचे प्रदूषण होतं.
एका अभ्यासानुसार सिगरेटचे फिल्टर नैसर्गिकरित्या लवकर विघटीत होत नाहीत. दोन वर्षानंतर देखील ते केवळ ३८ टक्केच विघटीत होतात.
सिगरेटच्या फिल्टरला पूर्णपणे विघटीत होण्यास तब्बल १० वर्षांच्या कालावधी लागतो. मात्र, या काळात फिल्टरमधून निघणाऱ्या अनेक घातक रसायनांमुळे पर्यावरणाचं मोठं नुकसान होतं.
सिगरेट पिल्यावर फेकण्यात आलेल्या फिल्टरमुळे पर्यावरणाला अनेक प्रकारे नुकसान पोहोचंत. हे फिल्टर पाण्यातून समुद्रात जातात. यामुळे जलचरांना मोठा धोका निर्माण होतो.
समुद्र किनाऱ्यावर सापडणाऱ्या कचऱ्यात सिगरेटचे फिल्टर सर्वाधिक अढळतात.
तज्ञानुसार समुद्रात पोहोचलेल्या फिल्टर समुद्रातील जीवसृष्टीसाठी सर्वाधिक घातक असतात.
जागतिक आरोग्य संघटनेच्या एका रीपोर्टनुसार सिगरेटच्या फिल्टरमध्ये १६५ प्रकारचे घातक रसायन असतात.