टीव्ही रिपोर्टर जॅकलिन फर्नांडिस अभिनेत्री कशी झाली?

By Harshada Bhirvandekar
Sep 10, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला श्रीलंकन ब्युटी म्हटले जाते. ती मूळची श्रीलंकन असून, तिने भारतात येऊन अभिनय क्षेत्रात करिअर केले.

जॅकलिनने अनेक चांगल्या चित्रपटात काम करून नाव कमावले आहे. भारतात येण्यापूर्वीही अभिनेत्री श्रीलंकेत राहायची. 

जॅकलिनचा जन्म ११ ऑगस्ट रोजी बहरीन येथे झाला. तिचे वडील श्रीलंकन तर आई मलेशियन आहे. 

जॅकलिनला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचं होतं. पण, तिने आधी आपले शिक्षण पूर्ण केले. 

जॅकलिनने सिडनी विद्यापीठातून मास कम्युनिकेशनमध्ये पदवी प्राप्त केली. तर, अभिनयाचे शिक्षण देखील घेतले. 

शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जॅकलिनने टीव्ही रिपोर्टर म्हणून काम केले. अभिनयात येण्यापूर्वी ती एक पत्रकार होती.

नोकरीसोबतच जॅकलिनने मॉडलिंग देखील सुरू केले. यादरम्यान तिने सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला. 

२००६मध्ये जॅकलिन मिस युनिव्हर्स श्रीलंका हा किताब जिंकला होता. जॅकलिनला हॉलिवुडमध्ये काम करायचे होते.

पण एका प्रोजेक्टसाठी ती भारतात आली आणि तिला अलादीन या चित्रपटात भूमिका मिळाली. यानंतर जॅकलिन भारतातच राहिली.

हृदयाचे रक्षण करणारे पदार्थ