मधुराणी प्रभुलकर कशी झाली ‘अरुंधती’?

All Photos: Instagram

By Harshada Bhirvandekar
May 28, 2024

Hindustan Times
Marathi

'आई कुठे काय करते' या लोकप्रिय मालिकेच्या माध्यमातून अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर घराघरांत पोहोचली आहे.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेत मधुराणी प्रभुलकर हिने साकारलेली आई चांगलीच गाजली.

तिच्या ‘अरुंधती’ या भूमिकेचं तुफान कौतुक झालं. मात्र, तिला ही भूमिका कशी मिळाली माहिती आहे का?

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं लेखन लेखिका रोहिणी निनावे यांनी केलं आहे.

रोहिणी निनावे यांना मधुराणी प्रभुलकर हिचा सालस चेहरा, तिचा अभिनय, शांत स्वभाव खूप आवडत होता.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचे लेखनाच काम रोहिणी निनावे यांच्याकडे आलं, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर मधुराणीचा चेहरा आला.

सुरुवातीला ३ मोठ्या मुलांची आई असणारे हे पात्र साकारायला मधुराणी कचरत होती, मात्र, रोहिणी यांनी तिची समजूत घातली.

या पात्राची खासियत, हे पात्र गाजलं तर मिळणारी लोकप्रियता याबद्दल जाणून घेतल्यानंतर मधुराणीने अखेर होकार दिला.

स्वतःच्या मुलीची जबाबदारी विश्वासाने पतीवर सोपवून त्याच्या साथीने मधुराणी ‘अरुंधती’ झाली.

‘बिग बॉस ओटीटी ३’च्या घरात एन्ट्री करणारी शिवानी कुमारी आहे तरी कोण?

All Photos: Instagram