स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क
freepik
By Hiral Shriram Gawande
Sep 20, 2024
Hindustan Times
Marathi
केस गळणे आणि स्प्लिट एंड ही समस्या बहुतेक लोकांना भेडसावत असते. स्प्लिट एंडपासून घरगुती उपायांनी आराम मिळू शकतो.
केस फुटणे किंवा दुतोंडी केस म्हणजे केसांच्या टोकांना दोन किंवा अधिक फाटलेले टोक दिसतात. याला स्प्लिट एंड हेअर म्हणतात.
अशा स्थितीत केस खूप रफ होतात. त्याला योग्य काळजी आणि पुरेसे पोषण आवश्यक आहे.
केसांच्या स्प्लिट एंडच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी येथे काही घरगुती उपाय आहेत. ते ट्राय करू शकता.
यासाठी तांदूळ, मेथी दाणे, एलोवेरा जेल, दही आणि तुरटी घ्या.
प्रथम तांदूळ आणि मेथी दाणे बारीक करा. यात एलोवेरा जेल, दही, तुरटी मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा.
ही पेस्ट केसांना लावा. काही वेळाने स्वच्छ धुवा. यामुळे स्प्लिट एंड्सपासून सुटका मिळू शकते आणि केस चमकदार देखील होऊ शकतात.
टीप: हे सामान्य माहितीवर आधारित आहे. तुम्हाला एलर्जी किंवा इतर कोणतीही समस्या असल्यास तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य आहे.
कारले खाण्याचे फायदे!
पुढील स्टोरी क्लिक करा